Showing posts with label ग्लोबल टीचर. Show all posts
Showing posts with label ग्लोबल टीचर. Show all posts

Saturday, January 22, 2022

इमानदार गुरुजींनो.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

इमानदार गुरुजींनो....

ग्लोबल वा इंटरनॅशनल असोत,
तुम्ही डिसले असोत वा वारे.
इथे सब घोडे बारा टक्के,
तुम्ही लोकल समजून घ्या रे.

हा साने गुरुजींचा काळ नाही,
हा नाणे गुरुजींचा काळ आहे.
इथे वेश्येला मणीहार तर,
पतिव्रतेवरती मात्र आळ आहे.

चाकोरी सोडू नका,
चाकोरी मोडू नका,
नसता त्याचेही मोल आहेत !
सिस्टीम ही सिस्टीम असते,
आमचे अनुभवाचे बोल आहेत !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6386
दैनिक पुण्यनगरी
22जानेवारी 2022

 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...