Showing posts with label जखमी स्वातंत्र्य... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label जखमी स्वातंत्र्य... मराठी वात्रटिका. Show all posts

Thursday, December 15, 2022

जखमी स्वातंत्र्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

जखमी स्वातंत्र्य

हा डायलॉग तर,
भलताच हुकमी आहे.
ज्याचे त्याचे स्वातंत्र्य,
आजकाल जखमी आहे.

जखमेतच स्वातंत्र्याचा,
आत्मा दडलेला आहे.
आपला हात मोडून,
गळ्यात पडलेला आहे.

धडधाकट स्वातंत्र्य,
जो तो शोधीत आहे !
किमान निषेधपुरते तरी,
स्वातंत्र्य अबाधित आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6662
दैनिक पुण्यनगरी
15डिसेंबर2022

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...