Showing posts with label तोच येतो हमखास निवडून...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label तोच येतो हमखास निवडून...मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, February 11, 2022

तोच येतो हमखास निवडून...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

तोच येतो हमखास निवडून

ज्याला धडधडीत खोटेसुद्धा,
चक्क खरे म्हणून ठसवता येते.
ज्याला स्वतःला सकट इतरांनाही,
अगदी उघड उघड फसवता येते.

ज्याला जनतेच्या दुःखावरती,
जनतेलाच खदाखदा हसवता येते.
ज्याला द्वेष आणि सूडाची आग,
मनामनात बदाबदा घुसता येते.

जो सपनोंका सौदागर होऊन,
मोठी व खोटी स्वप्न पेरू शकतो!
तोच येतो हमखास निवडून,
जो सगळी सौदेबाजी करू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6407
दैनिक पुण्यनगरी
11फेब्रुवारी 2022

 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...