Showing posts with label बजेट. Show all posts
Showing posts with label बजेट. Show all posts

Sunday, July 7, 2019

बजेट



आजची वात्रटिका
-----------------------------------
बजेट
आवक कमी,जावक जास्त,
पण खर्च मात्र दिसत नाही.
त्यालाच 'बजेट' म्हणतात,
जे कधीच कुणाचे बसत नाही.
महागाई जिंकते,स्वस्ताई हरते,
गदारोळही माजला जातो !
आकस्मिक खर्चाने तर,
बजेटचा गंडा वाजला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5501
दैनिक पुण्यनगरी
7जुलै2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...