Sunday, June 9, 2019

हाऊज दॅट ?

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
हाऊज दॅट ?
क्रिकेटपेक्षा नियम मोठे,
ही तर धोक्याची बेल आहे.
धोनीच्या स्टिकरवरून
सध्या आयसीसी ट्रोल आहे.
आयसीसीच्या या नियमांवर
कुणी डाऊट का घेत नाही?
कधी कधी दांडके उडूनही,
बॅट्समन आऊट होत नाही.
आयसीसीने आपल्या वृत्तीचा
डीआरएस घ्यायला पाहिजे !
क्रिकेटचा खेळखंडोबा नको,
त्याचा खेळ व्हायला पाहिजे !!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5472
दैनिक पुण्यनगरी
9जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Saturday, June 8, 2019

संसार

क्रिकेट विश्वकप 
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
संसार
त्याला आवडायचा फुटबॉल,
तिला आवडायचा क्रिकेट.
कधी व्हायचा गोल,
कधी पडायची विकेट.
तेंव्हा त्यांच्या लक्षात आले,
संसार म्हणजे खेळ असतो !
आवडी-निवडी वेगळ्या असूनही,
तो दोन जीवांचा मेळ असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
फेरफटका 
दैनिक झुंजार नेता 
7जुलै 2002
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

बायकोचा पोटहिस्सा

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
बायकोचा पोटहिस्सा
कोर्टाच्या बिनतोड निर्णयाने,
नोकरदार वर्ग थक्क आहे.
आता नवऱ्याच्या पगारावर
बायकोचा तीस टक्के हक्क आहे.
ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या,
त्यांना निर्णय समजून घ्यावा लागेल !
पगारावर शंभर ऐवजी तीस टक्के,
हक्क पाहिजे असल्यास,
अगोदर घटस्फोट द्यावा लागेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5471
दैनिक पुण्यनगरी
8जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

कँडल मार्च

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
कँडल मार्च
सत्ता आली नाही म्हणून
विरोधक जळायला लागले.
ईव्हीएम च्या विरोधात
मेणबत्त्या जाळायला लागले.
पारदर्शकता तर हवीच,
पण हे प्रतिगामी चाळे आहेत !
बोलून चालून कोळसेच ते,
कितीही उगळले तरी काळे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6971
दैनिक झुंजार नेता
8जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Friday, June 7, 2019

स्टंपिंग

क्रिकेट विश्वकप 
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
स्टंपिंग
त्याने क्रिझ सोडल्याचा,
तिला डाऊट येतो.
कुण्या थर्ड अंपायरच्या हातून
तो अलगद स्टँप आऊट होतो
संसार म्हणजेसुद्धा,
क्रिकेटचाच खेळ आहे !
तिने त्याला,तिला त्याने,
सावरण्याची हीच वेळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी 
दैनिक लोकप्रश्न 
11फेब्रुवारी 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

अनैतिक बळ

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
अनैतिक बळ
ज्यांच्यावर विश्वास होता,
तेच चेकाळू लागले.
त्यांचेच अनुकरण मग,
सर्वत्र बोकाळू लागले.
तरुणाई तर बेधुंद,
म्हाताऱ्यांना म्हातारचळ आहे !!
जे वेगाने वाढतेय,
ते अनैतिक बळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6970
दैनिक झुंजार नेता
7जून2019
--------------------------------
--------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

गुणवत्तेची टक्केवारी

सत्तेश्वर कृपा

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
सत्तेश्वर कृपा
राजकारणाचा खेळच असा की,
ज्याला कोणतेच नियम नसतात.
कोणतेही राजकीय फॉर्म्युले,
राजकारणात कधी कायम नसतात.
आघाड्या,युत्या,आश्वासने,
सगळा मामलाच नश्वर असतो !
जिथे फक्त सत्तेचेच चिंतन,
आणि सत्ता हाच ईश्वर असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5470
दैनिक पुण्यनगरी
7जून2019
-----------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Thursday, June 6, 2019

अनुचित प्रथा

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
अनुचित प्रथा
नेत्याचाच नेता होतो,
कार्यकर्त्याचा नेता नाही.
हा नियम जुनाच आहे,
तो काही फक्त आता नाही.
कार्यकर्ता कार्यकर्ताच रहावा,
हा विचार थोडाच उचित आहे?
कार्यकर्त्याचा नेता झाला,
असे उदाहरण क्वचित आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6969
दैनिक झुंजार नेता
6जून2019
--------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

ज्याचा त्याचा महिमा

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
ज्याचा त्याचा महिमा
पूर्वी सत्ता मागे पळायची,
आता सत्तेमागे पळावे लागते.
मागणी तसा पुरवठा करीत,
प्रत्यक्ष काळालाही वळावे लागते.
सत्तांधांचा महिमा मग,
काळाच्या नावे खपवला जातो !
समाजकारणाच्या आडोश्याला,
आपला स्वार्थ लपवला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5469
दैनिक पुण्यनगरी
6जून2019
-----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

डकवर्थ अ‍ँड लुईस

क्रिकेट विश्वकप 
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
डकवर्थ अँड लुईस
qजकत आलेला डाव हरतो,
तेंव्हा काळजाला चटका बसतो.
डकवर्थ अँड लुईस चा
नको तेवढा फटका बसतो.
असे काही घडले की,
डोळ्याम ध्ये येते पाणी !
डकवर्थ आणि लुईसही
गातात पावसाची गाणी !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
8मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

Wednesday, June 5, 2019

संपर्क क्षेत्र

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
संपर्क क्षेत्र
इकडे जावे की तिकडे जावे?
असे संभ्रमात्मक चित्र आहे.
कुणीही संपर्कात येईल,
असे संपर्काचे क्षेत्र आहे.
ज्याच्या त्याच्या संपर्कक्षेत्राची,
खूप वेगवेगळी रेंज असते !
पक्षांतर म्हणजे तरी काय?
ऑफरशिवाय एक्सेंज असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6968
दैनिक झुंजार नेता
5जून2019
-----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

वादेग्रस्त

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
वादेग्रस्त
काल होती;आज नाही,
गरज एवढी साधी आहे.
वाद्यांच्या तोडामोडीने,
नव्याने वादावादी आहे.
जे फसले गेलेत,
त्यांनी आसवे गाळू नयेत !
राजकीय नियमच आहे,
केलेले वादे पाळू नयेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5468
दैनिक पुण्यनगरी
5जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका

पृथ्वी वाचवा

पृथ्वी वाचवा
पृथ्वी वाचवा,पृथ्वी वाचवा,
जगा‘ध्ये ओरड आहे.
बोलण्याता आणि करण्यात
दोन्हीकडेही कोरड आहे.
खरी आपलीच भीती,
पृथ्वी वाचवा,पृथ्वी वाचवा
हा केवळ बहाणा आहे !
जेवढा माणूस क्रूर,
तेवढाच तो शहाणा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
#साप्ताहिकसूर्यकांती
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...