Wednesday, December 11, 2024

दैनिक वात्रटिका l 11 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 192 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 11 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 192 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

आघाडीचा महाविकास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आघाडीचा महाविकास

समुद्रात बुडणाऱ्या जहाजामधून,
उंदीर बाहेर पडायला लागले.
महाविकास आघाडीच्या बाबतीत,
नेमके असेच घडायला लागले.

विधानसभेनंतर आघाडीला तर,
संपूर्ण विसंगतीने घेरलेले आहे.
समाजवादी पक्षाच्या सायकलने,
त्यामुळेच तर पॅंडल मारलेले आहे.

हात मोडलाय; गळ्यात पडलाय,
स्वबळाच्या तुताऱ्या फुंकू नका !
बुडत्याचा पाय खोलात म्हणीत,
एकमेकांसमोर असत्य शिंकू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8766
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11डिसेंबर2024
 

Tuesday, December 10, 2024

दैनिक वात्रटिका l 10 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 191 वा l पाने -45


दैनिक वात्रटिका l 10 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 191 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

अध्यक्ष महोदय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अध्यक्ष महोदय...

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मतदानाने,
सगळेच गद्दार उजळून टाकले.
लोकशाही परंपरेचे दिवेही,
संधी मिळताच पाजळून टाकले.

अगदी लोकशाही मार्गानेच,
लोकशाहीचा सोक्षमोक्ष आहे.
कसला न्याय निवाडा करायचा?
जिथे उंदराला मांजर साक्ष आहे.

ज्यांनी ज्यांनी केली फंद फितुरी,
त्यांच्यावर छप्पर फाडके खैरात आहे !
निष्ठा - बिष्ठा इतिहास जमा झाल्या,
तोटा एके तोटाच तात्विक वैरात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8765
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10डिसेंबर2024
 

Monday, December 9, 2024

दैनिक वात्रटिका l 9 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 190 वा


दैनिक वात्रटिका l 9 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 190 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

ईव्हीएमची तिसरी बाजू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईव्हीएमची तिसरी बाजू

कालचे विरोधक वेगळे आहेत,
आजचे विरोधक वेगळे आहेत
विरोधक असोत वा समर्थक,
हे मात्र तेच तर सगळे आहेत.

समर्थन आणि विरोधाची,
आग एकदमच भडकली आहे.
दोघांच्याही कचट्यामध्ये,
आपली ईव्हीएम अडकली आहे.

जसे समर्थन मान्य आहे,
तसा विरोधसुद्धा मान्य आहे!
विरोध आणि समर्थन,
हे दोन्हीही परिस्थितीजन्यआहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8764
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9डिसेंबर2024
 

Sunday, December 8, 2024

दैनिक वात्रटिका l 8 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 189 वा l पाने -45


दैनिक वात्रटिका l 8 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 189 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

घराणेशाहीची प्रेरणा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घराणेशाहीची प्रेरणा

लोकशाहीचा उदो उदो करीत,
घराणेशाहीचा धक्का असतो.
प्रत्येक निवडणुकीवरती,
घराणेशाहीचा शिक्का असतो.

घराणेशालहीच्या शिकक्क्याला,
सगळीकडूनचन् मान्यता असते.
लोकशाहीला डोक्यावर घेण्यातच,
घराणेशाहीकडून धन्यता असते.

ज्याच्या त्याच्या घराणेशाहीमागे,
अगदी एकसारखीच धारणा असते !
एकाचे बघून दुसऱ्याला,
घराणेशाहीची प्रेरणा असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8763
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8डिसेंबर2024
 

Saturday, December 7, 2024

दैनिक वात्रटिका l 7 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 188 वा

दैनिक वात्रटिका l 7 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 188 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

सत्तेचे सत्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सत्तेचे सत्य

सत्ता हाती असल्याशिवाय,
कुणालाच काही जमत नाही.
सत्तेशिवाय कुणाचासुद्धा,
जीव थोडाही काही रमत नाही.

हातातली सत्ता म्हणजेच,
त्यांच्या मन:शांतीचे साधन आहे.
एकदा सत्ता ती आली की,
त्यांच्या आनंदाला आधण आहे.

सत्तेशिवाय कुत्रेही विचारत नाही,
याचीही सर्वांनाच जाण आहे !
प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष,
सत्ता हाच जीव की प्राण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8762
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7डिसेंबर2024
 

Friday, December 6, 2024

दैनिक वात्रटिका l 6 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 187 वा l पाने -45


दैनिक वात्रटिका l 6 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 187 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

देवेंद्र ३.०....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

देवेंद्र ३.०

जे मुख्य होते ते उप झाले,
जे उप होते ते मुख्य झाले.
जे जे अशक्य वाटत होते,
ते सुद्धा सहज शक्य झाले.

जसा दिसला उघड आनंद,
तशी उघड नाराजीसुद्धा आहे.
प्रमोशन आणि डीमोशन,
हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे.

सीएम नंतर डीसीएमचीही,
नवीन व्याख्या फिक्स आहे !
मुख्यमंत्र्यांच्या थर्ड इनिंग मध्ये,
उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8761
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6डिसेंबर2024
 

Thursday, December 5, 2024

दैनिक वात्रटिका l 5 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 186 वा l पाने -42


दैनिक वात्रटिका l 5 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 186 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

धडाकेबाज पुनरागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

धडाकेबाज पुनरागमन

मी पुन्हा येईन म्हणणारे,
आक्रमक होऊन आले आहेत.
साधेसुधे नाहीत तर,
स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत.

लपून-छपून काहीच नाही,
इरादे तर अगदी साफ आहेत.
जसे एक फुल दोन हाफ होते,
तसे एक फुल दोन हाफ आहेत.

टिंगल झाली;टवाळी झाली,
ठरवले तर काहीही शक्य आहे !
सप्रमाण सिद्ध करून दाखवले,
मीच खरा चाणक्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8760
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5 डिसेंबर2024
 

Wednesday, December 4, 2024

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 185 वा


दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 185 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

मारकडवाडीचा संदेश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मारकडवाडीचा संदेश

मारकडवाडीच्या मतदारांचा दावा,
ईव्हीएमने दिलेला कौल फेक आहे.
मारकडवाडीचे उदाहरण म्हणजे,
स्वतः स्वतःचीच रियालिटी चेक आहे.

एक मारकडवाडी रोखली गेली,
पण सर्वांनाच असे रोखता येणार नाही.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मापात,
सच्ची लोकभावना जोखता येणार नाही.

बॅलेट पेपर नको; चिठ्ठ्या नको,
यंत्रणा आपली परीक्षा बघू शकते !
उद्या शाळेतले मॉनिटर निवडतानाही,
ईव्हीएम मशीन आणावे लागू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8759
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4 डिसेंबर2024
 

Tuesday, December 3, 2024

दैनिक वात्रटिका l 3 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 184 वा l पाने -42


दैनिक वात्रटिका l 3 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 184 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

लोकसंख्या वाढवा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लोकसंख्या वाढवा

आपापल्या धार्मिकतेचे,
खरेखुरे दर्शन घडवा.
सगळीकडूनच आवाज येतोय,
आपली लोकसंख्या वाढवा.

लोकसंख्या वाढ शाप नाही,
लोकसंख्या एक वरदान आहे.
फक्त त्यालाच हे समजू शकते,
जो खरा कदरदान आहे.

लोकसंख्या वाढ प्रेरकांचा,
असा अजब गजब दावा आहे !
हम दो....हमारे तीन....
असा संकल्प त्यांना हवा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8758
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3 डिसेंबर2024
 

Monday, December 2, 2024

दैनिक वात्रटिका l 2 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 183 वा l पाने -42

दैनिक वात्रटिका l 2 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 183 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

नांदा सौख्य भरे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

नांदा सौख्य भरे

मुहूर्त ठरला;स्थळ ठरले,
सुपारी फोडायला अडकित्ता नाही.
नवरा आणि नवरीचासुद्धा,
अजून कसलाच पत्ता नाही.

नवरा आणि नवरी सोडून,
कलवरे कलवऱ्याच नटल्या आहेत.
पाहुणे ठरले ; रावळे ठरले,
अनधिकृत पत्रिका वाटल्या आहेत.

ज्याची जुळवा जुळवा झाली,
ते तर आकड्यांचे कोष्टक आहे !
मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन..
लग्ना आधीच मंगल अष्टक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
----------------------------
फेरफटका-8757
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 डिसेंबर2024
 

Sunday, December 1, 2024

दैनिक वात्रटिका l 1 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 182 वा


दैनिक वात्रटिका l 1 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 182 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.



 

ईव्हीएमची अग्निपरीक्षा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईव्हीएमची अग्निपरीक्षा

जसे कुणी कुणी अज्ञ आहेत,
तसे कुणी कुणी सुज्ञ आहेत.
ईव्हीएम वर बोलणारे,
कुणी कुणी संगणक तज्ञ आहेत.

सगळेच ईव्हीएम विरोधक,
अचानक एकवटले आहेत.
ज्यांची झाली होती बोलती बंद,
त्यांनासुद्धा कंठ फुटले आहेत.

निवडणूक आयोगाला सुद्धा,
आपला हेका नडता कामा नये !
किमान मतदार राजाचा तरी,
ईव्हीएमवरचा विश्वास उडता कामा नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8756
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 डिसेंबर2024
 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...