आजची वात्रटिका
--------------------------
देवेंद्र ३.०
जे मुख्य होते ते उप झाले,
जे उप होते ते मुख्य झाले.
जे जे अशक्य वाटत होते,
ते सुद्धा सहज शक्य झाले.
जसा दिसला उघड आनंद,
तशी उघड नाराजीसुद्धा आहे.
प्रमोशन आणि डीमोशन,
हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे.
सीएम नंतर डीसीएमचीही,
नवीन व्याख्या फिक्स आहे !
मुख्यमंत्र्यांच्या थर्ड इनिंग मध्ये,
उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8761
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6डिसेंबर2024
No comments:
Post a Comment