Tuesday, December 17, 2024

मंत्रीपदाचे आँखो देखा हाल..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मंत्रीपदाचे आँखो देखा हाल

कुणाची लागली लॉटरी,
कुठे वातावरण तंग आहे.
सगळीकडच्या इच्छुकांचा,
जास्तच अपेक्षाभंग आहे.

कुणाचा झाला हिरमोड,
कुणी तोंडावर आपटला आहे,
ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती,
त्यांनीच खुट्टा उपटला आहे.

नावच महायुती असल्यामुळे,
महा धुसफुस जाणवते आहे !!
शिल्लक ठेवलेली एक जागा,
शेकडो जणांना खुणवते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8771
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
17डिसेंबर2024
 

No comments:

daily vatratika...3april2025