Sunday, December 15, 2024

विषारी ट्रेंड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विषारी ट्रेंड

कायदा,राजकारण आणि गुन्हेगारी,
तिघांचाही विचित्र लव ट्रँगल आहे.
घटना कुठलीही असली तरी,
तिला स्वाती - धर्माचा अँगल आहे.

खरे काय आहे? खोटे काय आहे?
हे तर बाजूलाच राहिले जात आहे.
आपापल्या सोयीच्या चष्म्यातून,
सारे सोयीनुसार पाहिले जात आहे.

आपापल्या सोयीची अस्मिता,
घटना-घटनांमध्ये घुसवली जात आहे !
राक्षसी अहंकार आणि प्रतिष्ठेपायी,
आज माणुसकी नासवली जात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8769
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
15डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 199 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 199 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1PYyN96aQpR0k3Rlivv...