Sunday, December 29, 2024

मुद्देसूद विश्लेषण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

मुद्देसूद विश्लेषण

वातावरण गरम करून,
जेव्हा एखादा मुद्दा उबवला जातो.
तेव्हा प्रत्येकाकडूनच,
आपाला अजेंडा राबवला जातो.

आपल्या राजकीय अजेंड्याचे,
इथे प्रत्येकालाच पडलेले असते.
राजकीय खुराका अभावीच,
प्रत्येकाचे घोडे अडलेले असते.

वैयक्तिक हेवे दाव्यावरती,
प्रत्येक जण घसरला जातो !
मुद्दे तापतात;मुद्दे थंड होतात,
मात्र मूळ मुद्दा विसरला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8783
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
29डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...