आजची वात्रटिका
--------------------------
आयडेंटी
पद,प्रतिष्ठा आणि लायकी,
सगळी काही खोटी झाली.
जात आणि धर्म हीच,
माणसांची आयडेंटी झाली.
उठता बसता ओळखू येईल,
असेच आयडेंटी कार्ड आहे.
जिथे लावता येईल तिथे,
ज्याचा त्याचा कोड वर्ड आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
अगदी एकसारखी ओळख आहे!
कुठेतरी मानवतेचा संधीप्रकाश,
बाकी सगळा काळोख आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8781
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
27डिसेंबर2024
No comments:
Post a Comment