आजची वात्रटिका
--------------------
मायाजाल
कुणाचे केले जाते उघड,
कुणाचे मात्र झाकून ठेवले जाते.
कुणालातरी मागे पुढे उभे करून,
कुणालातरी ग्रहण लावले जाते.
कुणीतरी असतो छत्रधारी,
त्याची कुणावर तरी छाया असते.
कुणालाही जाळ्यात अडकवते,
तिचे नाव राजकीय माया असते.
राजकारणाची मोहिनी अशी की,
तावडीत कुणीही गावला जातो !
भस्मासुराला स्वतःच्या डोक्यावरती,
स्वतःच हात ठेवायला लावला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8785
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
31डिसेंबर2024
No comments:
Post a Comment