आजची वात्रटिका
--------------------------
हाक ना बोंब
राजकारण आणि गुन्हेगारी,
एकमेकांना आश्रय देत आहेत.
याचे पुराव्यावर पुरावे,
रोज आपल्यासमोर येत आहेत.
हाती कितीही पुरावे असले तरी,
कोणतेच पुरावे सिद्ध होत नाहीत.
हे सारे थांबले पाहिजे यासाठी,
सामान्य लोकही सिद्ध होत नाहीत.
जसे सामान्य लोक कारण आहेत,
तसे सामान्य लोक शरण आहेत !
कायद्यावर भरवसा नसल्यानेच,
लोकांकडून मौनव्रतं धारण आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8775
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
21डिसेंबर2024
No comments:
Post a Comment