Wednesday, December 25, 2024

भुजबळांची नाराजी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भुजबळांची नाराजी

ओबीसी पासून बीबीसी पर्यंत,
सर्वत्र नाराजीची वार्ता आहे.
आपण म्हणूच शकत नाही,
नाराजीचा प्रश्न पक्षापुरता आहे.

ज्यांचे आर्म स्ट्रॉंग आहेत,
जणू त्यांचे पाय खेचले आहेत.
मामला पक्षांतर्गत असला तरी,
धागेदोरे इतरत्र पोचले आहेत.

कुणाला मंत्रिमंडळात नकोत,
कुणाला मंत्रिमंडळात हवे आहेत !
मिस टाइमिंग झाल्याचे,
घड्याळाचे मात्र दावे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8779
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
25डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 25 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 206 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 25 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 206 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1TFYxfT...