आजची वात्रटिका
--------------------------
ईव्हीएमची तिसरी बाजू
कालचे विरोधक वेगळे आहेत,
आजचे विरोधक वेगळे आहेत
विरोधक असोत वा समर्थक,
हे मात्र तेच तर सगळे आहेत.
समर्थन आणि विरोधाची,
आग एकदमच भडकली आहे.
दोघांच्याही कचट्यामध्ये,
आपली ईव्हीएम अडकली आहे.
जसे समर्थन मान्य आहे,
तसा विरोधसुद्धा मान्य आहे!
विरोध आणि समर्थन,
हे दोन्हीही परिस्थितीजन्यआहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8764
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9डिसेंबर2024
No comments:
Post a Comment