आजची वात्रटिका
--------------------------
नाटकाचा तमाशा
त्यांनी आरोप केला की,
हेही प्रत्यारोप करू लागले.
ज्यांची घरे काचेची आहेत,
तेच एकमेकांना दगड मारू लागले.
आरोप आणि प्रत्यारोपांची,
कुणालाच लाज ना लज्जा आहे.
परस्परांच्या इज्जतींचा,
बिनधास्तपणे फज्जा आहे.
कुणी चिडल्यासारखा करतो आहे,
कुणी रडल्यासारखे करतो आहे !
एकूणच सगळ्या नाटकावर,
पडदा पडल्यासारखा ठरतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8778
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
24डिसेंबर2024
No comments:
Post a Comment