Saturday, December 14, 2024

राजकीय बुद्धीबळ ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय बुद्धीबळ

बुद्धी आणि बळाला राजकारणातून,
कधीसुद्धा गाळता येत नाही.
बुद्धी आणि बळ असल्याशिवाय,
राजकीय बुद्धिबळ खेळता येत नाही.

ज्याला वाटेल त्याला प्यादे करून,
पाहिजे तसे चालवता आले पाहिजे.
आडव्या,उभ्या आणि तिरप्या चालींनी,
तालावरती डोलवता आले पाहिजे.

आपल्याबरोबर विरोधकांनाही,
शह आणि काटशह देता आला पाहिजे !
विरोधकांनी डाव जिंकला तरी,
त्याचा आनंद काढून घेता आला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8768
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 199 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 199 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1PYyN96aQpR0k3Rlivv...