Monday, December 23, 2024

स्वतंत्र विचार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

स्वतंत्र विचार

आपल्या मनासारखे वागले की,
तो मग मस्तीचा भाग होतो.
दुसऱ्याच्या मनासारखे वागले की,
तो मग शिस्तीचा भाग होतो.

त्यामुळेच मेंढ्यासारखे वागले की,
त्यांना शिस्तबद्ध म्हटले जाते.
कुणी स्वतःच्या डोक्याने वागले की,
शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते.

त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये,
स्वतंत्र प्रचारावाले नको आहेत !
सिस्टीमच धोक्यात आणतील असे,
स्वतंत्र विचारावाले नको आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8777
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
23डिसेंबर2024
 

No comments:

daily vatratika...26dec2024