Thursday, December 5, 2024

धडाकेबाज पुनरागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

धडाकेबाज पुनरागमन

मी पुन्हा येईन म्हणणारे,
आक्रमक होऊन आले आहेत.
साधेसुधे नाहीत तर,
स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत.

लपून-छपून काहीच नाही,
इरादे तर अगदी साफ आहेत.
जसे एक फुल दोन हाफ होते,
तसे एक फुल दोन हाफ आहेत.

टिंगल झाली;टवाळी झाली,
ठरवले तर काहीही शक्य आहे !
सप्रमाण सिद्ध करून दाखवले,
मीच खरा चाणक्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8760
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5 डिसेंबर2024
 

No comments:

daily vatratika...3april2025