आजची वात्रटिका
--------------------------
सत्तेचे सत्य
सत्ता हाती असल्याशिवाय,
कुणालाच काही जमत नाही.
सत्तेशिवाय कुणाचासुद्धा,
जीव थोडाही काही रमत नाही.
हातातली सत्ता म्हणजेच,
त्यांच्या मन:शांतीचे साधन आहे.
एकदा सत्ता ती आली की,
त्यांच्या आनंदाला आधण आहे.
सत्तेशिवाय कुत्रेही विचारत नाही,
याचीही सर्वांनाच जाण आहे !
प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष,
सत्ता हाच जीव की प्राण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8762
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7डिसेंबर2024
No comments:
Post a Comment