आजची वात्रटिका
--------------------------
मी पुन्हा येईल:पार्ट2
कुणालाच कधी वाटले नव्हते,
राजकारणात असे काही होईल.
आता सगळेच म्हणू लागले,
मी पुन्हा येईल,मी पुन्हा येईल.
ज्यांचे ज्यांचे गेले मंत्रीपद,
त्यांचा पुन्हा येण्याचा दावा आहे.
अडीच वर्ष लवकर जावोत,
त्यांचाच देवाकडे धावा आहे.
अडीच वर्षांची वाट बघत बघत,
ते 'दिवा'स्वप्नात रमायला लागले !
मी पुन्हा येईलचे सूर,
महाराष्ट्रामध्ये घुमायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8774
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
20डिसेंबर2024
No comments:
Post a Comment