आजची वात्रटिका
--------------------------
अभद्र दोस्ती
गुन्हेगारीला राजकारण,
राजकारणाला गुन्हेगारी प्यारी आहे.
त्यामुळेच की काय?
हल्ली दोघांचीही पक्की यारी आहे.
राजकारण आणि गुन्हेगारी,
परस्परांच्या मदतीला धावले जातात.
एकमेकांच्या जीवावरती,
आपापले झेंडे लावले जातात.
आम्हाला काय कुणाची भीती?
एवढेच दोघांच्याही डोक्यात आहे !
दोघांच्याही दोस्तीत आणि मस्तीत,
सामाजिक शांतता धोक्यात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8780
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
26डिसेंबर2024
No comments:
Post a Comment