आजची वात्रटिका
--------------------------
बंडामागची बाजू
कोणत्याही नेत्याच्या बंडाला,
कार्यकर्त्यांचा आधार असतो.
कार्यकर्त्यांचा भविष्यकाळ,
आपल्या नेत्यांकडे उधार असतो.
नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे,
सारखेच सर्वपक्षीय दृश्य असते.
नेत्यांच्या भविष्यावर,
सर्वच कार्यकर्त्यांचे भविष्य असते.
बंडात कार्यकर्ता जोडला जातो,
बंडात कार्यकर्ता ओढला जातो !
कार्यकर्त्यांचा अंदाज घेऊनच,
बंडांचा संकल्प सोडला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8773
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
19डिसेंबर2024
No comments:
Post a Comment