Friday, December 13, 2024

फॉर्मुल्याचे सूत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फॉर्मुल्याचे सूत्र

जेव्हा विसंवाद आणि संघर्ष,
नको नको तेवढे वाढले जातात.
कशाचाही वाटपाचा तोडगे म्हणून,
राजकीय फॉर्मुले काढले जातात.

कुणालाच काही सांगता येत नाही,
कधी फॉर्म्युला कोणता असतो?
सुटता सुटता वाढत जाणारा,
राजकीय फॉर्मुल्यांचा गुंता असतो.

वाटाघाटी नंतर होते वाटावाटी,
मतभेदाला बाजूला ठेवले जाते!
जे जे वाट्याला आले त्यालाच,
फॉर्मुल्याची लेबल लावले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8767
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 199 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 199 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1PYyN96aQpR0k3Rlivv...