आजची वात्रटिका
-------------------------
सुपारी आणि खंडणी
सुपार्या आणि खंडणीचा,
सगळीकडूनच जप आहे.
नैतिकतेच्या व्यवहाराला,
अनैतिकतेचा शाप आहे.
नैतिक आणि अनैतिकेमध्ये,
पुसट अशी सीमारेषा आहे.
सुपारी आणि खंडणीची,
त्यामुळेच वाढती भाषा आहे.
वाजलेल्या सुपार्या बघून,
खंडणीलाही उकळी आहे !
वाटेकर्यांच्या हातामध्ये,
फुल ना फुलाची पाकळी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8782
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
28डिसेंबर2024
No comments:
Post a Comment