आजची वात्रटिका
--------------------------
घराणेशाहीची प्रेरणा
लोकशाहीचा उदो उदो करीत,
घराणेशाहीचा धक्का असतो.
प्रत्येक निवडणुकीवरती,
घराणेशाहीचा शिक्का असतो.
घराणेशालहीच्या शिकक्क्याला,
सगळीकडूनचन् मान्यता असते.
लोकशाहीला डोक्यावर घेण्यातच,
घराणेशाहीकडून धन्यता असते.
ज्याच्या त्याच्या घराणेशाहीमागे,
अगदी एकसारखीच धारणा असते !
एकाचे बघून दुसऱ्याला,
घराणेशाहीची प्रेरणा असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8763
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8डिसेंबर2024
No comments:
Post a Comment