Wednesday, December 11, 2024

आघाडीचा महाविकास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आघाडीचा महाविकास

समुद्रात बुडणाऱ्या जहाजामधून,
उंदीर बाहेर पडायला लागले.
महाविकास आघाडीच्या बाबतीत,
नेमके असेच घडायला लागले.

विधानसभेनंतर आघाडीला तर,
संपूर्ण विसंगतीने घेरलेले आहे.
समाजवादी पक्षाच्या सायकलने,
त्यामुळेच तर पॅंडल मारलेले आहे.

हात मोडलाय; गळ्यात पडलाय,
स्वबळाच्या तुताऱ्या फुंकू नका !
बुडत्याचा पाय खोलात म्हणीत,
एकमेकांसमोर असत्य शिंकू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8766
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11डिसेंबर2024
 

No comments:

daily vatratika...3april2025