Monday, December 30, 2024

'कल्ला' कारांसाठी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

'कल्ला' कारांसाठी...

राजकारणामुळे कलाकारांची,
इज्जत वेशीला टांगली आहे.
कलाकारांना कलाकार राहू द्या,
मागणीही तशी चांगली आहे.

अन्यायाविरुद्ध बंड असावे,
अन्यायाविरुद्ध बंड आहे.
काही काही कलाकारांनाही,
राजकारणाचा प्रचंड कंड आहे.

कधी तळ्यात;कधी मळ्यात,
इथेच तर सगळा घोळ आहे !
राजकारणी कलावंतांमुळे,
इतर कलावंतांनाही झळ आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8784
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
30डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...