Monday, December 16, 2024

विस्ताराचा आढावा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विस्ताराचा आढावा

ज्यांना नाकारले ते नाराज,
ज्यांना मिळाले त्यांना हर्ष आहे.
मिळालेल्या मंत्री पदाची मुदत,
सध्या तरी अडीच वर्ष आहे.

कुणाची निष्ठा फळाला आली,
कुणाच्या निष्ठेचे मात्र भजे आहेत.
लोकशाहीच्या स्वागताला मात्र,
घराणेशाहीचेच नवे डीजे आहेत.

जसे कुणी धक्के दिले आहेत,
तसे कुणाला धक्के बसत आहेत !
लाडक्या बहिणी खुश केल्या तरी,
लाडके भाऊ नापास दिसत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8770
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
16डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 199 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 18 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 199 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1PYyN96aQpR0k3Rlivv...