आजची वात्रटिका
--------------------------
बंडाचा किडा
बंडाचा पंचनामा करावा,
तेवढा पंचनामा थोडा आहे.
कधीही वळवळू शकतो,
असा बंडाचा किडा आहे.
बंडाचा किडा घुसला की,
तो भूतकाळ उकरू लागतो.
आपल्याबरोबर इतरांच्याही,
तो मेंदूला टोकरू लागतो.
कधी बंडोबांचे कौतुक तर,
कधी बंडोबांची कीव आहे!
मेला नाही; मरणार नाही,
बंडाचा किडा चिरंजीव आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8772
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
18डिसेंबर2024
No comments:
Post a Comment