Sunday, December 22, 2024

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

खाते वाटप

कुणाला आवडीचे भेटले गेले,
कुणाला नावडीचे भेटले गेले.
जे जे बिन खात्याचे मंत्री होते,
त्यांना अखेर खाते वाटले गेले.

कुणासाठी कारभार एकतंत्री,
कुणासाठी कारभार त्रितंत्री आहे.
विरोधकांचा नेहमीच आरोप,
ही तर वऱ्हाडमागून वाजंत्री आहे.

आवडीचे असो वा नावडीचे,
शेवटी प्रत्येक खाते हे खाते आहे !
लोकांना खात्री वाटली पाहिजे
सरकारचे माय बापाचे नाते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
---------------------------
फेरफटका-8776
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
22डिसेंबर2024
 

No comments:

daily vatratika...22dec2024