Tuesday, December 10, 2024

अध्यक्ष महोदय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अध्यक्ष महोदय...

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मतदानाने,
सगळेच गद्दार उजळून टाकले.
लोकशाही परंपरेचे दिवेही,
संधी मिळताच पाजळून टाकले.

अगदी लोकशाही मार्गानेच,
लोकशाहीचा सोक्षमोक्ष आहे.
कसला न्याय निवाडा करायचा?
जिथे उंदराला मांजर साक्ष आहे.

ज्यांनी ज्यांनी केली फंद फितुरी,
त्यांच्यावर छप्पर फाडके खैरात आहे !
निष्ठा - बिष्ठा इतिहास जमा झाल्या,
तोटा एके तोटाच तात्विक वैरात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8765
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10डिसेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 11 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 192 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 11 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 192 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1KZYLVjqCNmp4fTTzf-...