Monday, January 4, 2010

सरकारी मानसिकता

***** आजची वात्रटिका *****
*********************

सरकारी मानसिकता

फुकटची सुट्टी मिळाली की,
कर्मचारी सुखावले जातात.
हक्काची सुट्टी गेले की,
कर्मचारी दुखावले जातात.

कर्मचार्‍यांना वाटते,
सुट्टीत जयंत्या,पुण्यतिथ्यांचा,
व्यत्यय यायला नको होता
महापुरूषांनी जन्मसुद्धा
सुट्टीत घ्यायला नको होता.

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...