Saturday, January 16, 2010

सूर्यग्रहण

***** आजची वात्रटिका *****
*********************

सूर्यग्रहण

चंद्रकोर बघण्याची सवय
इथे चंद्रही कोरला होता.
आपले अस्त्तित्त्व दाखविताना
इथे चंद्रही विरला होता.

सूर्य झाला चंद्रमा,
चांदण्याही भाळल्या असत्या.
त्या नव्हत्या म्हणून बरे झाले,
त्याही रास खेळल्या असत्या.

ह्या सावल्यांच्या खेळावरती
कुणी अक्कल पाजळी्त होते
कुणी लुटला आनंद,
कुणी मंत्र उजळीत होते.

प्रकाशाच्या सम्राटालाही
ग्रहणामधून जावे लागते !
म्हणूनच ग्रहण कोणतेही असो
ते समजून घ्यावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...