Sunday, January 24, 2010

थंडीच्या टिप्स्

***** आजची वात्रटिका *****
*********************

थंडीच्या टिप्स्

थंडी काटेरी असली तरी
थंडी गोजरी करता येते.
थंड डोक्याने केली तर
थंडी साजरी करता येते.

थंडी खावी,थंडी प्यावी,
थंडीलाही नशा चढवू शकता.
थंडीला कपातच काय?
बाटलीतही बुडवू शकता.

हुडहूडत का होईना,
ज्याला किल्ला लढवता येतो !
थंडीचा उतरता पारा
त्यालाच खरा चढवता येतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...