***** आजची वात्रटिका *****
*********************
काव्य-शास्त्र
कविता रचली जात नाही,
कविता सूचली जात असते.
समाजमग्न कविताच
आत्मियतेने वाचली जात असते.
दांभिकतेची कातडी
कवितेने सोलली पाहिजे.
अन्याय,अत्याचार,शोषण,
याविरूद्ध कविता बोलली पाहिजे.
वृत्त,अलंकार इत्यादींनी
कवितेचे सौंदर्य वाढले जाते.
मात्र साधे,सरळ,सोपेच
या मनाचे त्या मनाला भिडले जाते.
कवितांच्या या सागरात
केवळ छंद म्हणून पोहू नका !
वैचारिक बैठक नसेल तर
केवळ कंड म्हणून लिहू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment