Monday, March 22, 2010

कॉपीमुक्ती

***** आजची वात्रटिका *****
**********************

कॉपीमुक्ती

कॉपी म्हणजे चोरी,
ती केवळ नक्कल नाही.
आपणच सिद्ध करतो,
आपल्याला अक्कल नाही.

नक्कल ती नक्कल,
अस्सल ते अस्सल असते.
गुणवत्ता म्हणजे,
स्वत:शीच टस्सल असते.

चला आपण सारे
गुणवत्तेचे भक्त होऊ या !
कॉपीमुक्ती करण्यासाठी
आपण कॉपीमुक्त होऊ या !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Mr. Shantaram Khamkar said...

धन्यवाद!

आपण दिलेल्या प्रेमाने खरोखर भारावलो आहे..असाच स्नेह वाढावा हिच अभिलाषा...

दैनिक वात्रटिका6मे2024....वर्ष- तिसरे..अंक -3334वा

दैनिक वात्रटिका 6मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -3334वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1WSxYXp3pJLhh-mSC3cjaoRYkm...