Monday, February 24, 2025

दांडी गुल ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

दांडी गुल

तमाम भारतीय क्रिकेटवेड्यांची,
इच्छा अखेर फळास आली आहे.
आयआयटीवाल्या बाबा बरोबर,
पाकिस्तानची दांडी गुल झाली आहे.

आपलाच देश जिंकणार....
अशी दोन्हीही देशात एकवाक्यता होती.
यात भविष्य सांगण्यासारखे काय होते?
विजयाची फिफ्टी-फिफ्टी शक्यता होती.

चौकार आणि षटकारासोबतच,
फटका कानमागेही खेचला आहे!
भविष्यवाणी नेहमी बंडल असते,
हा चांगला संदेश सर्वत्र पोचला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8839
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24फेब्रुवारी2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 25फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 268वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 25फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 268वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/17NMjfUFSuKHqUFCnG...