Thursday, February 6, 2025

उपसा आणि सिंचन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

उपसा आणि सिंचन

कुठे निष्ठेचे सिंचन आहे,
कुठे निष्ठेचा उपसा आहे.
हापस हापस हपसायला,
निष्ठा म्हणजे हापसा आहे.

हापसलेल्या निष्ठेमध्ये,
आतली खदखद वाहू लागली.
एकमेकांची निष्ठा मग,
पाण्यामध्ये पाहू लागली.

राजकीय दुष्काळाला,
सत्तेच्या पाण्याची तहान आहे !
ज्याला पाणी पाजता येते,
तोच सर्वांपेक्षा महान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8821
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6फेब्रुवारी2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 264वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 21फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 264वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/14O3HEC4Tpq6mqn...