Thursday, February 20, 2025

छावा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

छावा

विरोधकांची कोल्हेकुई शांत,
एवढे मात्र नक्की आहे,
त्यांनी लावले ' कौशल ' पणाला,
आता नवा चेहरा विक्की आहे.

मालिका काय?चित्रपट काय?
मनोरंजन एके मनोरंजन आहे.
जुन्या प्रतिमेचे नव्या प्रतिमेकडून,
सिनेमॅटिक प्रतिमा भंजन आहे.

ना आमचा कसला आक्षेप,
ना कसला आमचा दावा आहे !
नव्या प्रतिमा आणि प्रतिमानासह,
आपल्यासमोर छावा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8835
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20फेब्रुवारी2025
 

No comments:

कॉपीड व्यवस्था....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- कॉपीड व्यवस्था बारावी एवढा दहावीतही, कॉपी युक्तीचा पुरावा आहे. बारावीनंतर दहावीतही, कॉपीमुक्तीचा तेरावा ...