Wednesday, February 5, 2025

अशी ही बंगल्यांची तऱ्हा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

अशी ही बंगल्यांची तऱ्हा

शकुन अपशकूनांच्या चर्चा,
लिंबू मिरचीच्या संगे आहेत.
काळया जादूच्या जोडीला,
म्हणे रेड्यांची शिंगे आहेत.

प्रत्येकाला महत्त्वकांक्षा आहे,
प्रत्येकाला राजकीय ईर्षा आहे.
रामटेकच्या साक्षीला,
आता मुख्यमंत्र्यांचा वर्षा आहे.

बंगल्यांचे अपशकुन,
उदाहरणासहित स्पष्ट आहेत !
त्यांच्यावरती गंडांतर येणारच,
जे मुळातच भ्रष्ट आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8820
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5फेब्रुवारी2025
 

No comments:

DAILY VATRATIKA...5FEB2025