Wednesday, February 26, 2025

इतिहासाचे सादरीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

इतिहासाचे सादरीकरण

ज्याला जसा पाहिजे तसा,
इतिहास दामटला जातो.
ऐतिहासिक दामटादमटीत,
इतिहास चेमटला जातो.

ज्या पाहिजे त्या रंगात,
इतिहास रंगवला जातो.
कधी अकलेचे तारे तोडून,
इतिहास गुंगवला जातो.

अजेंडा पक्का करूनच,
इतिहास पेश केला जातो !
कोरडा इतिहास ओला करून,
इतिहास कॅश केला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8841
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26फेब्रुवारी2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 26फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 269वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 26फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 269वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/182q7Ac9K1Sx_xt...