आजची वात्रटिका
--------------------
जातीचे टोकन
कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे,
कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे.
ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला,
आपल्या जातीपातीचे टेकण आहे.
त्याला जातीपातीचे टेकण लागते,
ज्याचे स्वतःचे बुड काही नीट नाही.
ओंगळवाण्या जातीप्रदर्शनाचा,
का कुणालाच कसा वीट नाही ?
जातीसाठी फक्त मातीच नाही तर,
अजून काही बाही खायला लागले !
जिथे नको तिथे सुद्धा,
जातीपातीचे प्रदर्शन व्हायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8817
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 फेब्रुवारी2025
No comments:
Post a Comment