Friday, February 21, 2025

डुप्लिकेटपणा थांबवा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

डुप्लिकेटपणा थांबवा

काल अवघड वाटणाऱ्या गोष्टी,
आज अचानक सोप्या झाल्या.
ज्याच्या व्हायला नको आहेत,
अशा गोष्टींच्याही कॉप्या झाल्या.

ओरिजनल अशी कुठेच नाही,
सगळीकडेच डुप्लिकेट शैली आहे.
ज्याला कळाले तो म्हणतो,
हे राम तेरी गंगा तो मैली आहे.

स्वतःची शैली जशी आहे,
अगदी शैली तशीच असू द्या !
तुमच्या जागी दुसरे कुणी नको,
लोकांना तुमच्यातले तुम्ही दिसू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8836
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21फेब्रुवारी2025
 

No comments:

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...