आजची वात्रटिका
--------------------
अर्थसंकल्पाचा सार
मध्यमवर्गाला खुश करण्याचे,
अर्थसंकल्प हे एक माध्यम आहे.
2025 चा अर्थसंकल्प म्हणजे,
सगळेच कसे मध्यम मध्यम आहे.
कुणाचा आयकर कमी झाला,
कुणाकुणाला आयकर माफ आहे.
जीएसटी म्हणजे तर,
आय कराचाच दुसरा बाप आहे.
थोडी खुशी थोडा गम,
कुणावर कमी अधिक भार आहे!
विरोधकांची नाराजी,
हा तर अर्थसंकल्पाचा सार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8818
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 फेब्रुवारी2025
No comments:
Post a Comment