आजची वात्रटिका
--------------------
महाराष्ट्र केसरी
कुस्तीसारख्या कुस्तीची,
मॅटवर घसरा-घसरी आहे.
वादाच्या भोवऱ्यामध्ये,
पुन्हा 'महाराष्ट्र केसरी' आहे.
फुटबॉल व्हाया क्रिकेट,
बाधलेली कुस्ती आहे.
फिक्सिंगच्या मिक्सिंगची,
कुस्तीलाही मस्ती आहे.
खेळापेक्षा नियम मोठे झाले,
खिलाडूवृत्तीत घट होते आहे!
पहिलवान आणि संघटनांकडून,
कुस्तीच चितपट होते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8819
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4फेब्रुवारी2025

No comments:
Post a Comment