आजची वात्रटिका
--------------------
पक्षांतराचे भविष्य
फोडाफोडी आणि ओढाओढी,
हे तर सगळे चालूच आहे.
दुसरीकडे गेल्यावरतीही,
तिसरीकडची लालूच आहे.
फोडाफोडी थांबली जाईल,
ना असा कुणाकडे जॅमर आहे.
हे सगळे चालतच राहणार,
जोपर्यंत लालूच अमर आहे.
फोडणारा आणि फुटणारा,
एवढाच फरक पडत जाईल !
लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी,
कायमच पक्षांतर घडत राहील!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9314
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 जून 2026












