आजची वात्रटिका
----------------------------
कॉपीचे पेव
परीक्षेतील कॉप्यांमुळे,
गुणवत्ता उघडी होत आहे.
शरणागत झाल्यामुळे,
व्यवस्था नागडी होत आहे.
कुठे कुठे ठिगळ लावणार?
जिथे आभाळच फाटले आहे.
केजी पासून पीजी पर्यंत,
कॉपीचेच पेव फुटले आहे.
खोट्या नाट्या गुणवत्तेचे,
सगळेच पोवाडे गात आहेत !
कॉपीच्या दगडाखाली,
सर्व लाभार्थ्यांचे हात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9198
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 फेब्रुवारी 2026