Showing posts with label चिकट गुंडा. Show all posts
Showing posts with label चिकट गुंडा. Show all posts

Sunday, February 22, 2026

चिकट गुंडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चिकट गुंडा
कुणालाच कुणाचीही,
साथ सोडता येत नाही.
राजकारणापासून गुन्हेगारीला,
वेगळे काढता येत नाही.
गुन्हेगारी आणि राजकारण,
एकमेकांना सोसत आहेत.
गुन्हेगारी आणि राजकारण,
एकमेकांना पोसत आहेत.
गुन्हेगारी आणि राजकारण,
एकमेकांचे पाठीराखे आहेत !
बटेंगे तो कटेंगेचे,
दोघांनाही सारखेच धोके आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9197
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22 फेब्रुवारी 2026

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...