Showing posts with label नम्र विनंती. Show all posts
Showing posts with label नम्र विनंती. Show all posts

Saturday, July 18, 2026

नम्र विनंती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
नम्र विनंती
सुशिक्षितांपेक्षा अशिक्षित बरे,
ते चुकीचा मार्ग धरत नाहीत.
जिथे उजडेन तिथे उजडेन,
ते आत्महत्या करत नाहीत.
इथे जर नरक असेल तर,
जाणार तिथे काही स्वर्ग नाही.
हे पुन्हा कशाला सांगायला हवे?
पळकुटेपणा हा काही मार्ग नाही.
लढत रहा, पडत रहा,
पण लढण्याआधी हरू नका !
लढताना हरलात तरी चालेल,
फक्त आत्महत्या करू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9341
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 जुलै 2026

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...